Shona

नकळत हे झाले असे अन
मन जुळले माझे-तुझे
दरवळतो प्रेमाचा मौसम
जग हसरे माझे-तुझे

अनोळखी वाटेवरी भान हरवले जरी
शहारल्या क्षणात ही तोल सावरताना

ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना

अबोल स्वप्नांचे तरंग उठताना, हा
ये बोलुया डोळ्यातुनी
तुझ्या इशाऱ्याने उनाड वारा हे
खुणावतो भासातुनी

जिथे-जिथे फिरे नज़र
तुझा असर, तुझा बहर

ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना

मनातले सारे ओठांवरी आले
हुरहूर ही लागे नवी
सुगंध श्वासांचा श्वासांत भरताना
मिठी जणू उमलावी

तुझ्यात मी, माझ्यात तु
पुकारतो नवा ऋतू

ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना
ये ना, शोना ये ना



Credits
Writer(s): Gupte Avadhoot, Mandar Shashikant Cholkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link