Tu Shwaas Sare (Male)

दाटूनी आले आभाळ सारे
डोळ्यांत मेघासवे
नाते मनाचे का दुर झाले?
का आटली आसवे?

दाही दिशांना आभास वेडे
बेभानली आठवे

तू श्वास सारे, तू ध्यास सारे
आभास सारे, बस तू ही, तू
तू श्वास सारे, तू ध्यास सारे
आभास सारे, बस तू ही, तू

अधुरी उरली कहानी (कहानी)
अवेळी मनी दाटते
अधुऱ्या हळव्या क्षणांचे
धुके हे मला वेढते

हा, दिसे ना कोठे किनारे
अजुनी तुला शोधते
जुळुनी नाते जीवांचे
कळे ना कसे मोडते

तू बंध सारे, तू गंध सारे
तू रंग सारे, बस तू ही, तू
तू श्वास सारे, तू ध्यास सारे
आभास सारे, बस तू ही, तू

हो, वळूनी मागे जरासे
पुसावे धुके आज मी
जपावे नाते सुखाचे
जगावे तुझे स्वप्न मी

Hmm, भिजुनी ओल्या क्षणांनी
मिटावी पुन्हा पापणी
दुरावे मागे सरावे
दिसावी पुन्हा ओढ ती

तू स्वप्न सारे, तू स्पर्श सारे
तू हर्ष सारे, बस तू ही, तू
तू श्वास सारे, तू ध्यास सारे
आभास सारे, बस तू ही, तू

तू बंध सारे, तू गंध सारे
तू रंग सारे, बस तू ही, तू
तू श्वास सारे, तू ध्यास सारे
आभास सारे, बस तू ही, तू



Credits
Writer(s): Ambarish Deshpande, Ajay Naik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link