Angaarvedana

सोसते कधीची अंगारवेदना
तूच मालवावी हळुवार वेदना
सोसते कधीची अंगारवेदना
तूच मालवावी हळुवार वेदना

एकदा कळू दे आयुष्य ते तुझे
एकदा कळू दे आयुष्य ते तुझे
दे मला जगाया, दे चार वेदना

सोसते कधीची अंगारवेदना
तूच मालवावी हळुवार वेदना

मी हसून केले हे दुःख रेशमी
मी हसून केले हे दुःख रेशमी
ल्यायलास तू ही अलवार वेदना

सोसते कधीची अंगारवेदना
तूच मालवावी हळुवार वेदना

ज्योत काळजाची पणतीत माझिया
ज्योत काळजाची पणतीत माझिया
जाळण्या निघाली अंधारवेदना, अंधारवेदना

सोसते कधीची अंगारवेदना
तूच मालवावी हळुवार वेदना
सोसते कधीची अंगारवेदना
तूच मालवावी हळुवार वेदना



Credits
Writer(s): Bhagwant Narvekar, Anil Sable
Lyrics powered by www.musixmatch.com

Link