Vara

हिरव्या-हिरव्या गवतातून वारा आला गिरगिरत
सळसळणाऱ्या पानातून वारा आला भिरभिरत
(हिरव्या-हिरव्या गवतातून वारा आला गिरगिरत)
(सळसळणाऱ्या पानातून वारा आला भिरभिरत)

हिरव्या-हिरव्या गवतातून आली लाट, गेली लाट
(हिरव्या-हिरव्या गवतातून आली लाट, गेली लाट)
निळ्या-निळ्या पाण्याचा विस्कटून गेला काच
(निळ्या-निळ्या पाण्याचा विस्कटून गेला काच)

लभाळ्याच्या बेटामध्ये चतुर पक्षी चमचमले
(लभाळ्याच्या बेटामध्ये चतुर पक्षी चमचमले)
एक पिवळे फुलपाखरू उडता नाच खूप दमले
(एक पिवळे फुलपाखरू उडता नाच खूप दमले)

बुंध्यावरून सरसरणाऱ्या मुंग्या थांबल्या नवलानं
(बुंध्यावरून सरसरणाऱ्या मुंग्या थांबल्या नवलानं)
आणि म्हणाल्या, "ऐका गं, कोण गातसे हे गाणं"
(आणि म्हणाल्या, "ऐका गं, कोण गातसे हे गाणं")

झाडावरच्या पक्षानं शीळ घातली सुईदार
(झाडावरच्या पक्षानं शीळ घातली सुईदार)
जरा खाली आली, पुन्हा उंच उडत गेली घार
(जरा खाली आली, पुन्हा उंच उडत गेली घार)

अवचित आला वारा, तोच आदळला कानावर
(अवचित आला वारा, तोच आदळला कानावर)
असा भ्यालो मी म्हणता जाऊन थेट गाठले घर
(असा भ्यालो मी म्हणता जाऊन थेट गाठले घर)



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link