Lajran Sajra Mukhda

मुखडा तुझा मुखडा
जणू चंद्रावाणी खुलला
तुझ्या रूपाचं गोंदण
माझ्या मनात हा भिनला गं

मुखडा, तुझा मुखडा
जणू चंद्रावाणी खुलला
तुझ्या रूपाचं गोंदण
माझ्या मनात हा भिनला गं

(साजणी) एक लाजरानं साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं

एक लाजरानं साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं

तुझं रूप हे नक्षत्राच
जणू बहरल्या रानाचं
तुझ्या रुपामंदी हरलो मी
काय होईल या खुळ्या मनाचं

आलं सोळाव वरीस प्रेमाचं
नात जडलंय तुझं नि माझं
तुझ्या नजरेला भुललो मी
आभाळ फुटलंय माझ्या मनाचं

तुझ्यासाठी मी आंदण आणली
माझ्या इश्काची दौलत ही
तुझ्यासाठी मी आंदण आणली
माझ्या इश्काची दौलत ही

एक लाजरानं साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमाची नशा
हा जीव आज गुतला रं

कशी सांगू मी सख्या तुला रं?
लाज दाटून आलेय मनामंदी
ग्वाड सपानं हे खुललंय रं
याड लागलंय, राज्या, तुझ्या पिरतीमंदी

माझं काळीज हे इरघळलं
हाये मायेची उब तुझ्या मिठीमंदी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंदी

कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंदी

एक लाजरानं साजरा मुखडा
माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
कि जीव आज गुतला गं

एक लाजरानं साजरा मुखडा
माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
कि जीव आज गुतला गं



Credits
Writer(s): Prashant Nakti
Lyrics powered by www.musixmatch.com

Link