Tuch Mauli Ga Mazi Savali Vithai

ध्यानी-मनी स्वप्नी माझ्या अंतरात राही
ध्यानी-मनी स्वप्नी माझ्या अंतरात राही
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई

दळीता-कांडीता नित्य मुखी तुझे नाम
तूच पाठीशी रे, उभा विठू घनश्याम
आ, दळीता-कांडीता नित्य मुखी तुझे नाम
तूच पाठीशी रे, उभा विठू घनश्याम

झाली धन्य नामयाची दासी ती जनाई
झाली धन्य नामयाची दासी ती जनाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई

आ, तूच तारी येई संत तुकयाची गाथा
तूच धावला भुपती साठी रे, अंनता
आ, तूच तारी येई संत तुकयाची गाथा
तूच धावला भुपती साठी रे, अंनता

झाली लिन तुझ्या चरणी भोळी मी रमाई
झाली लिन तुझ्या चरणी भोळी मी रमाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई

हो, तूच दिली सुदाम्याला सोन्याची नगरी
तूच वसविली भिमातीरी ही पंढरी
हो, तूच दिली सुदाम्याला सोन्याची नगरी
तूच वसविली भिमातीरी ही पंढरी

झाला पुंडलिकसाठी तूच उतराई
झाला पुंडलिकसाठी तूच उतराई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई

ध्यानी-मनी स्वप्नी माझ्या अंतरात राही
ध्यानी-मनी स्वप्नी माझ्या अंतरात राही
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई
तूच माऊली गं, माझी सावळी विठाई



Credits
Writer(s): Ramnath Mhatre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link