Barsaat Aali

श्वास गंधाळला धुंदला हा असा
प्रेमाची आस ही मोहरली
भास धुंदावला भारला हा असा

प्रेमाची ओढ ही बावरली
नभ वर दाटती जरी मग बरसतील
प्रेमाच्या सरिची

बरसात आली, बरसात आली
नभ वर दाटती सरी मग बरसतील
प्रेमाच्या सरिची बरसात आली

ऊन सावलीचे हे नाते अनोखे
वाऱ्यासवे मग झुरते मन बावरे
मातीचे हे ओले इशारे
गंधासवे मग उमटती पावले

ओळखीचे स्पर्श सारे
खरे की भासणारे, धुक्यातही हे शोधती
तुझीच वाटवा रे

वाऱ्यासवे येशील मन चिंब करशील
प्रेमाच्या सरिची
बरसात आली, बरसात आली

ऋतू हा अधीर झाला ओघात वाहून गेला
फुलत्या कळीचा आधार झाला
बेभान झाला किनारा
लाटेस बिलगून म्हणाला

तुझा स्पर्श हवासा आहे मला
सई तू थांबशील मन धुंद करशील
प्रेमाच्या सरीचे

श्वास गंधाळला धुंदला हा असा
प्रेमाची आस ही मोहरली
भास धुंदावला भारला हा असा
प्रेमाची ओढ ही बावरली

नभ वर दाटती जरी मग बरसतील
प्रेमाच्या सरिची
बरसात आली, बरसात आली
बरसात आली, बरसात आली



Credits
Writer(s): Sanket Mestri, Bhagyesh Sanjay Patil, Siddhartha Chitale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link