Vanava

वनवा...
वनवा जिव्हारात पेटलाय दाट
थकलंय डोळं देवा हरलीय वाट
हे वनवा जिव्हारात पेटलाय दाट
थकलंय डोळं देवा हरलीय वाट

नाही कुणीरं आता धरायला बोटं
वेड हे मन रं माझं अडलंय कुठं?

सांग देवा एक डाव, आता तरी माझी लाव
नवकाठीराला दिस ना समीनदराच काठ
सांग देवा एक डाव, आता तरी माझी लाव
नवकाठीराला दिस ना समीनदराच काठ

हे, ये कुठलीय नाती सारी, सुटलंय बंध
सुखल्या फुलाला आता कसला रं गंध
हरलोय देवा मी रं पेच ह्यो सुटना
लीला तुझी रं न्यारी परी का तू अंध

दगडाच्या देवा सांग, आता तरी तुझा थांग
येतो तिथं सांगतो मी माझ्या या उरातलं रं पेट
सांग देवा एक डाव, आता तरी माझी लाव
नवकाठीराला दिस ना समीनदराच काठ



Credits
Writer(s): Vinay Deshpande, Rahul Suryawanshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link