Deva Ganesha

देवा गणेशा माया तुझी रे
निर्माण करिसी सृष्टीस तू (सृष्टीस तू, सृष्टीस तू)
देवा गणेशा माया तुझी रे
निर्माण करिसी सृष्टीस तू
ना मावसी तू जगतात साऱ्या
हृदयात कैसा बसतोस तू? (बसतोस तू?)

हे गजानना, स्वीकार ही वंदना
हे गजानना, स्वीकार ही वंदना
माझ्या मनातली तू ऐक रे भावना

ज्ञानेंद्रियांच्या ठाई तुझा, देवा, असू दे सहवास रे
ज्ञानेंद्रियांच्या ठाई तुझा, देवा, असू दे सहवास रे
मध, मोह, क्रोधास अन् काम, लोभास जाळून सांभाळ बुद्धीस रे

हा देहभावा मंदिर आणि आत्मा ही भावा मूर्ति तुझी
(मूर्ति तुझी, मूर्ति तुझी)

हे गजानना, स्वीकार ही वंदना
हे गजानना, स्वीकार ही वंदना
हो, माझ्या मनातली तू ऐक रे भावना

तू सूर, श्वासात, लयनाद, तालात, असतोस शब्दात, अर्थात तू
तू सूर, श्वासात, लयनाद, तालात, असतोस शब्दात, अर्थात तू
तेजात, तिमिरात दोन्हींकडे तू, परब्रम्ह अद्वैत आहेस तू

तू अंत-आरंभ, हे, गौरीतनया, तू सर्वव्यापी विश्वात्मका
(विश्वात्मका, विश्वात्मका)

हे गजानना, स्वीकार ही वंदना
हे गजानना, स्वीकार ही वंदना
हो, माझ्या मनातली तू ऐक रे भावना



Credits
Writer(s): Sachidanand Appa, Raghunath Matkari
Lyrics powered by www.musixmatch.com

Link