Tuch Re Kinara

शब्दातल्या अर्थामध्ये, अर्थातल्या भावामध्ये
स्वछंद या श्वासामध्ये, जशी तू माझ्यामध्ये
आभास या भासामध्ये, निःस्वार्थ या ध्यासामध्ये
स्वछंद या श्वासामध्ये, जशी तू माझ्यामध्ये

ना उमगला, ना समजला, ना गवसला तू
मी चंद्रमा, मी पौर्णिमा, मी चांदण्या, ब्रह्मांड तू

तूच रे किनारा, तूच रे निवारा
तूच रे किनारा, तूच रे निवारा

वेदना दुःखातली, संवेदना स्पर्शातली
हा गोडवा स्वप्नातला, हा मारवा गीतातला
वेदना दुःखातली, संवेदना स्पर्शातली
हा गोडवा स्वप्नातला, हा मारवा गीतातला

श्वासातले, भासातले, स्वप्नातले सत्य तू
मी चंद्रमा, मी पौर्णिमा, मी चांदण्या, ब्रह्मांड तू

तूच रे किनारा, तूच रे निवारा
तूच रे किनारा, तूच रे निवारा

विरह ह्या प्रेमातला, अंकुर हा भेदातला
ही पान गं वाऱ्यातली, ही सावली उन्हातली
विरह ह्या प्रेमातला, अंकुर हा भेदातला
ही पान गं वाऱ्यातली, ही सावली उन्हातली

शोधू इथे, शोधू तिथे आहे कुठे सांग तू?
मी चंद्रमा, मी पौर्णिमा, मी चांदण्या, ब्रह्मांड तू

तूच रे किनारा, तूच रे निवारा
तूच रे किनारा



Credits
Writer(s): Vaibhav Choudhari, Mohit Manuja
Lyrics powered by www.musixmatch.com

Link