Ram Krishna Hari

हेचि दान देगा देवा मला आता
विसर ना व्हावा तुझा ठेवेन मी माथा
चरणी तुझ्या मी येईन शरण करून पायी वारी तुझ्या परी सांगण्या मी माझी गाथा
जीवनात नाहीये गोल,
सगळे करत बसले स्क्रोल
पहिला संपला दुसरा रोल केला
कामापुरता झोल,खोटे प्रेम खोटे बोल
नात्यापेक्षा मोठा फोन,मध्ये व्यस्त झाले मौन
याला दोषी तरी कोण,बट्ट्याबोळ
ही बनली आता कलियुगी भेळ इथे रक्ताच्या नात्यात पण नाही राहिला मेळ,फक्त चाललीय चढाओढ,एक सरस तर दुसरा तोड,सारीपाट ह्या जगाचा नाही जमला कोणा खेळ.

कोणी जगो कोणी मरो इथे थांबत कोणी नाही
मनातील दुःख,त्रास ऐकत कोणी नाही
तोंड खोटं बोलेल पण डोळे बोलत नाही
माणसं जरी भुलले तरी कर्मा विसरत नाही

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरी हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरी हरी

कशास हवा लोभ,पैशाच्या तू का पाठी,उगाच का तो गर्व,अहंकारी तू स्वार्थी,आयुष्यभर धावपळ तरी ना काही हाथी,जळेल शेवटी देह या कृष्णेच्याच काठी
शुभ चींतावे, इच्छावे वचनी शुभ हे बोलावे
जीवनाचे सोने शुभ कर्माने हे करावे
मरावे तरी ही किर्ती रुपी मागे उरावे
काम असे करावे की नाम लोकं जपावे

शक्ती संघटित,नको बनू संभ्रमित,
कितीही असुदे कठीण सुटेल कळेल अवघड हे गणित जगणे सोपे हे कधीना तू स्वतः आधार देना थोडा लागेल याला वेळ शेवटी होईल सारं ठीक.
सारं असूनी जवळ मन आत तुझे झुरी
करीसी जैसे कर्म तैसे भोग पाठीवरी
सुखाच्या शोधात ओलांड दुःखाची ती दरी
सदैव मुखी ठेव सतत नाम तुझ्या हरी

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरी हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरी हरी



Credits
Writer(s): Abhijit Chorat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link