Door Vaata Saad Dayte

दुर वाटा साद देती, दे दिशांच्या हात हाती
दुर वाटा साद देती, दे दिशांच्या हात हाती
घे भरारी उंच बाळा, कल्पनांशी जोड नाती

दुर वाटा साद देती, दे दिशांच्या हात हाती
घे भरारी उंच बाळा, कल्पनांशी जोड नाती
कुस मायेची तुला जायची सोडून रे
सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे
सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे

ओल येते पापण्यांना, सांजताना जीव तुटतो
ओल येते पापण्यांना, सांजताना जीव तुटतो
नजर वळते अंबराशी...
नजर वळते अंबराशी, घास ओठाशीच अडतो

ऐकू येते हाक आई ना कळे कोठून रे
सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे

दुर वाटा साद देती, दे दिशांच्या हात हाती
घे भरारी उंच बाळा, कल्पनांशी जोड नाती
कुस मायेची तुला जायची सोडून रे
सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे
सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे

Credits
Writer(s): Guru Thakur, Rahul Ranade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link