Bavare Prem

बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम
बेदर्दी तू, कशी सावरू?
मनपाखरू भिरभिरते प्रीतीचे

बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम

उरी स्वप्न माझे साथ तुझी द्यावी
मला ही मिळावी
गुज मनी चाले बंध हे जुळावे
मनाचे मनाशी

बेदर्दी तू, कशी सावरू?
मनपाखरू भिरभिरते प्रीतीचे
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम

हात तुझा हाती, मुके शब्द होती
तेच सूर गाती, मेघ सुखावती
थेंब चातकासी, मी सुगंधीत माती

बेदर्दी तू, कशी सावरू?
मनपाखरू भिरभिरते प्रीतीचे
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम

हा, बावऱ्या मनाला कृष्ण साद घाली
जशी राधिका मी
अंतरात माझ्या तुझी मूर्त व्यापी
ना माझी राहिले मी

बेदर्दी तू, कशी सावरू?
मनपाखरू भिरभिरते प्रीतीचे
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम
बावरे प्रेम माझे, बावरे प्रेम



Credits
Writer(s): Chandramohan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link