Naman Ya Dinkara Punya Ghe Gathila

नमन या दिनकरा, पुण्य घे गाठीला
उठवूनी पळवितो कुणी लुळा-पांगळा
नमन या दिनकरा, पुण्य घे गाठीला

श्रेष्ठता दावितो या जगाला रवी
दीपवितो हृदयीचे सहज तो चक्षू ही

उदय अन अस्त ही जीवनी शृंखला
शिकवितो सत्य हे निर्मूनी मंगला
नमन या दिनकरा, पुण्य घे गाठीला

आळसा सोड तू, कष्ट घे जीवना
देत जा तू तुझ्या लाभ दे सांत्वना

प्रेम दे तू जगा, अर्थ रे भक्तीला
अन्यथा व्यर्थ हे मी मला अन मला
नमन या दिनकरा, पुण्य घे गाठीला

का उगा जोडीसी धान्य आणि धना?
त्यापरी नाम घे सूर्यनारायणा

दिव्यता भानूची इच्छि देते फळा
रंगते भाग्य हो हा रवी शृंखला
नमन या दिनकरा, पुण्य घे गाठीला
उठवूनी पळवितो कुणी लुळा-पांगळा
नमन या दिनकरा, पुण्य घे गाठीला



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Mohan Samant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link