Bahutan Sukrute Nardeh Laadhla

बहुता सुकृती नरदेह लाधला
भक्तिवीण गेला अधोगती
बाप भाग्य कैसे न सरेचि कर्म
न कळेचि वर्म अरे मूढा
अनेका जन्माचे सुकृत पदरी
त्याचे मुखी हरि पैठा होय
राव रंक हो का उच नीच याती
भक्तिवीण माती मुखी त्यांच्या
एका जनार्दनी हरी हरी म्हणतां
मुक्ती सायुज्जता पाठी लागे



Credits
Writer(s): Gayatree Gaikwad Gulhane Sant Eknath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link