Maze Daivat

माझे दैवत माझे बाबा आई
माझे दैवत माझे बाबा आई
ऋण त्यांचे कैसे फेडू होऊ उतराई
ऋण त्यांचे कैसे फेडू होऊ उतराई

माझे दैवत माझे बाबा आई
माझे दैवत माझे बाबा आई
ऋण त्यांचे कैसे फेडू होऊ उतराई
ऋण त्यांचे कैसे फेडू होऊ उतराई
माझे दैवत माझे बाबा आई
माझे दैवत माझे बाबा आई

काळजाचा पाळणा नजरेची दोरी
वेदनांची सोबत मानली शिदोरी
काळजाचा पाळणा नजरेची दोरी
वेदनांची सोबत मानली शिदोरी
आसवांचे तेल डोळ्यांचे ही दीप
राहिला आई तुम्ही त्यांच्या समीप

माझे दैवत माझे बाबा आई
ऋण त्यांचे कैसे फेडू होऊ उतराई
माझे दैवत माझे बाबा आई

पाठीशी पुण्याई जन्म जन्मांतरी
म्हणुनीच आलो मी या पवित्र मंदिरी
पाठीशी पुण्याई जन्म जन्मांतरी
म्हणुनीच आलो मी या पवित्र मंदिरी
देव रूप आता शोधू मी कशाला
सावलीत तुमच्या माझा धन्य जन्म झाला

माझे दैवत माझे बाबा आई
ऋण त्यांचे कैसे फेडू होऊ उतराई
माझे दैवत माझे बाबा आई

आभाळाची माया ओथंबली डोळा
बाप पाठीराखा जन्माचा सोहळा
आभाळाची माया ओथंबली डोळा
बाप पाठीराखा जन्माचा सोहळा
रात्रंदिन झिजले चंदनाचे रूप
जळता जळता झाला सुगंधित धूप

माझे दैवत माझे बाबा आई
ऋण त्यांचे कैसे फेडू होऊ उतराई
माझे दैवत माझे बाबा आई



Credits
Writer(s): Yuvraj Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link