Thech Lagli

कसा ह्यो संसार ज्याले लागलं जिव्हार
कोठ दडलं सुख डोंगराच्या पल्ल्याड?
सरे ना ह्या जिंदगीच्या खडतर वाटा
सरे ना ह्या जिंदगीच्या खडतर वाटा

ठेच लागली...
ठेच लागली पार फुटला अंगुठा
ठेच लागली पार फुटला अंगुठा

करपलं रान रं, दवडली शान रं
हरपला मान-आन, जडलं हिरवं पान रं
आस ना कुणाची, भास हे सुखाची
थकून गेलो चालून मी वाट संसाराची

आधार ज्याले समजलं निंगाला तो फासा
आधार ज्याले समजलं निंगाला तो फासा

ठेच लागली...
ठेच लागली पार फुटला अंगुठा
ठेच लागली पार फुटला अंगुठा



Credits
Writer(s): Vaibhav Choudhari, Mohit Manuja
Lyrics powered by www.musixmatch.com

Link