He Ganesha He Deva Mahadeshwara

अष्टविनायकांपैकी वरदविनायकाचं स्थान
म्हणजे मुंबई-पुणे मार्गावर
खोपोली जवळचं महड गाव
इथली गणेश मूर्ती दगडी सिंहासनावर
विराजमान झाली आहे

सिंहसनावर दोन गजराज कोरले असून
मध्यभागी मूर्ती आहे
१८९२ सालापासून या मंदिरातील नंदादीप
अखंड तेवत आहे

गाभाऱ्याच्या दारावर रिद्धी-सिद्दीच्या
मूर्ती कोरलेल्या आहेत
देवळाच्या माग असलेल्या तळ्यात
एका दैवी दृष्टांतानुसार
भक्ताला गणेश मूर्ती सापडली

ती तळ्या जवळच अखंड दगडी
कोनाड्यात स्थापण्यात आली
पुढं पेशव्यांचे सरदार विवलकर
यांनी तिथं देऊळ बांधलं

आणि वरदविनायकस महात्म्य
उत्तर-उत्तर वाढतच गेलं
भाद्रपद आणि माघ या दोन्ही महिन्यात
शुक्ल प्रतिपदार्थ पंचमी
या काळात इथं गणेश उत्सव होतो

हे गणेशा, हे देवा, महाडेश्वरा
हे गणेशा, हे देवा, महाडेश्वरा
तारिसी साऱ्या भक्तासी तू विघ्नहर

येई दारी तुझ्या जो नवस सांगूनी
येई दारी तुझ्या जो नवस सांगूनी
वरददायी सकळांचा रे देसी तू वर
(हे गणेशा, हे देवा, महाडेश्वरा)
(तारिसी साऱ्या भक्तासी तू विघ्नहर)

वधील त्रिपुरासुरा शंकराने इथे
वृत्स मदाचे पातक शिवकृपेने मिटे
वधील त्रिपुरासुरा शंकराने इथे
वृत्स मदाचे पातक शिवकृपेने मिटे

पुण्यक्षेत्राची ह्या म्हणुनी महती असे
नयनांचे हे सुख दर्शनाने मिळे
नयनांचे हे सुख दर्शनाने मिळे

विघ्नेशा, ओंकारा, हे लंबोदरा
विघ्नेशा, ओंकारा, हे लंबोदरा
हे कृपासिंधू, करुणा कर आम्हावर
(येई दारी तुझ्या जो नवस सांगूनी)
(वरददायी सकळांचा रे देसी तू वर)

आलो शरणी तुझ्या, चरणी थारा तू दे
मजसी क्लेशातुनी या निवारा तू दे
आलो शरणी तुझ्या, चरणी थारा तू दे
मजसी क्लेशातुनी या निवारा तू दे

सिद्धी दे, बुद्धी दे तू हे गिरीजात्मजा
एक तुज मागणे ही सफल हो पूजा
एक तुज मागणे ही सफल हो पूजा

ऐक माझी विनंती, हे सुखदायका
ऐक माझी विनंती, हे सुखदायका
ही उभी दासी दोन्ही हे जोडुनी कर
(हे गणेशा, हे देवा, महाडेश्वरा)
(तारिसी साऱ्या भक्तासी तू विघ्नहर)

न्हाऊ घालू तुला प्रेमगंगा जळे
रूप सजवू तुझे आगळे-वेगळे
न्हाऊ घालू तुला प्रेमगंगा जळे
रूप सजवू तुझे आगळे-वेगळे

नित श्रद्धेची आरास तुज आवडे
भक्तीभावाचा नैदीप्य तुझियापुढे
भक्तीभावाचा नैदीप्य तुझियापुढे

स्वामी तिन्ही जगाचा तू गणनायका
स्वामी तिन्ही जगाचा तू गणनायका
तू दयाळू, कृपाळू, तू कल्याणकर
(हे गणेशा, हे देवा, महाडेश्वरा)
(तारिसी साऱ्या भक्तासी तू विघ्नहर)



Credits
Writer(s): Sayed Ali, Rohini Ninave
Lyrics powered by www.musixmatch.com

Link