Vasudev Nighale Nanda Ghari

सर्व गोष्टी विधिलिखिता प्रमाणेच घडत असतात
प्रभूच्या लिलेमुळे कारागृहातील रक्षक झोपलेले आहेत
कारागृहाची दार आपोआप उघडली गेली आहेत
हे लक्षात येऊन देवकीच्या विनंतीला मान देऊन

वसुदेव त्या छोट्याश्या तान्हुल्याला घेऊन
त्या तशा मुसळधार पावसात मथुरेहून गोकुळात
नंदराजाकडे जाण्यास निघाले

निजवंश दीपका धरून शिरी
निजवंश दीपका धरून शिरी
वसुदेव निघाले नंदघरी
वसुदेव निघाले नंदघरी

निजवंश दीपका धरून शिरी
निजवंश दीपका धरून शिरी
वसुदेव निघाले नंदघरी
वसुदेव निघाले नंदघरी

मुसळधार वर वर्षे पाऊस
मुसळधार वर वर्षे पाऊस
पथिक चालला निर्भय माणस
पथिक चालला निर्भय माणस

अंगच अवघे झाले डोळस
अंगच अवघे झाले डोळस

पथ दिसे तमिरी दूरवरी
पथ दिसे तमिरी दूरवरी
वसुदेव निघाले नंदघरी
वसुदेव निघाले नंदघरी

कसली उतरण, कसली चढती
कसली उतरण, कसली चढती
पायघड्यासम पायापुढती
पायघड्यासम पायापुढती

स्वयेच वाटा पथ उलघडती
स्वयेच वाटा पथ उलघडती

प्रभू नाम घोळवीत जिभेवरी
प्रभू नाम घोळवीत जिभेवरी
वसुदेव निघाले नंदघरी
वसुदेव निघाले नंदघरी

तोच अचानक करीत गर्जना
तोच अचानक करीत गर्जना
हळवी आली सरिता, यमुना
हळवी आली सरिता, यमुना

उधळीत उर्मी फेकीत फेना
उधळीत उर्मी फेकीत फेना

यमभगिनी दिसे ती तदा खरी
यमभगिनी दिसे ती तदा खरी
वसुदेव निघाले नंदघरी
वसुदेव निघाले नंदघरी

जनक उतरला जळी सुतासह
जनक उतरला जळी सुतासह
चढले जळ तो अतिवदुस्तह
चढले जळ तो अतिवदुस्तह

पुरात गवसे जणू पंकेरुह
पुरात गवसे जणू पंकेरुह

तनू तुटे तरंगे फुलवरी
तनू तुटे तरंगे फुलवरी
वसुदेव निघाले नंदघरी
वसुदेव निघाले नंदघरी

चढता-चढता चढली यमुना
चढता-चढता चढली यमुना
चढुनी भिडली श्रीहरीचरणा
चढुनी भिडली श्रीहरीचरणा

एकच घेऊन तृप्त चुंबना
एकच घेऊन तृप्त चुंबना

झरझरा परत ती जाय दुरी
झरझरा परत ती जाय दुरी
वसुदेव निघाले नंदघरी
वसुदेव निघाले नंदघरी



Credits
Writer(s): Sham Joshi, G.d.madgulkar G.d.madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link