Rin Phitata Fitena

किती देशील, देशील दान मला पेलवेना

ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना
ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना

कुण्या जन्मातले पुण्य तुझ्या रूपात भेटले
माझे काळोखाचे घर, तुझ्या प्रकाशात न्हाले
कुण्या जन्मातले पुण्य तुझ्या रूपात भेटले
माझे काळोखाचे घर, तुझ्या प्रकाशात न्हाले

तेज ओसंडून वाहे...
तेज ओसंडून वाहे, एक थेंबही आटे ना
ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना
ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना

जगावेगळी कशाला सांग लाविलीस माया?
माझ्या पोळल्या जिवाला तुझी सोसवेना छाया
जगावेगळी कशाला सांग लाविलीस माया?
माझ्या पोळल्या जिवाला तुझी सोसवेना छाया

भाग्य थोर लाभे मला...
भाग्य थोर लाभे मला परी मनाला पटे ना
ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना
ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना

किती ओझे मी वहावे, कसे व्हावे उतराई?
काय देऊन तुला मी सांग करू भरपाई?

पडे माझे मला कोडे...
पडे माझे मला कोडे काही केल्या ते सुटे ना
ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना
ऋण फिटता फिटे ना, ऋण फिटता फिटे ना



Credits
Writer(s): Sudhir Moghe, Anand Modak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link