Aala Vara Aala

आला, वारा आला, रान मोकळे हे
तुझ्या मनातले मज सांग हे गोड गुज सारे
आला, वारा आला, तोल सावर सखे
वाऱ्यासंगे गं, माझा झुला गं कसा डोले-झुले
आला, वारा आला...

उडे पदर गं वाऱ्यावरी
राघू बघतो गं डोकावूनी
हसू फुटतंय गं ओठांवरी
नभ झुलतंय तुझ्या रुपावरी

पाखरांचे पंख लेवू दे
आभाळी झोका जाऊ दे

आला, वारा आला, रान मोकळे हे
तुझ्या मनातले मज सांग हे गोड गुज सारे
आला, वारा आला, तोल सावर सखे
वाऱ्यासंगे गं, माझा झुला गं कसा डोले-झुले
आला, वारा आला...

हा, वेडा पाऊस डोंगरी थांबे
नभी उडे पाखरांचे थवे
जरा झुळझुळ-झुळझुळ गं पाणी कसे
मन माझे मासोळी जसे

आज तुझं रूप खुललं
तुझं-माझं गाणं रंगलं

आला, वारा आला, तोल सावर सखे
वाऱ्यासंगे गं, माझा झुला गं कसा डोले-झुले
आला, वारा आला, रान मोकळे हे
तुझ्या मनातले मज सांग हे गोड गुज सारे

हो, वाऱ्यासंगे गं, माझा झुला गं कसा डोले-झुले
आला, वारा आला...



Credits
Writer(s): Harish Chawhan, Neeta Devkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link