Dilacha Raja

सुन्या-सुन्या आभाळाला चंद्राची ओढ गं
तशी माझ्या मनामंदी तुझी हूरहूर गं
मागं-मागं फिरुन तुझ्या काळीज ही दमलं
रात-रात जागून डोळं लाल-लाल जाहलं

मनामध्ये पिरमाचं बीज मी पेरलं
नजरेने माझ्या तुला लाखामध्ये हेरलं

दिलाचा राजा होशील का? दिलाचा राजा?
दिलाची राणी होशील का? दिलाची राणी?
दिलाचा राजा होशील का? दिलाचा राजा?
दिलाची राणी होशील का? दिलाची राणी?

ऊन-ऊन, पावसाचा खेळ जसा आज मांडला
डोळ्यामध्ये तुच रंगला
रुणझुण तालावर गाणं जशी गायी कोकीळा
तुझ्यामंदी जीव दंगला

निळ्या-निळ्या आभाळात चमके चांदनी
तशी तुझ्या नाकामंदी शोभतीया मोरनी

दिलाचा राजा होशील का? दिलाचा राजा?
दिलाची राणी होशील का? दिलाची राणी?
दिलाचा राजा होशील का? दिलाचा राजा?
दिलाची राणी होशील का? दिलाची राणी?

चालताना सोबतीला संगे दिसे तुझी सावली
मनामध्ये स्वप्न साजली
थकलेल्या पावलांना हाताची या माझ्या पालखी
मिठीमंदी तुला झाकली

हात देला सोडू नको, जीव मी टांगला
जीव तुझा मोत्यावाणी शिंपलात जुपला

दिलाचा राजा, माझ्या तु दिलाचा राजा
दिलाची राणी, माझी तु दिलाची राणी
दिलाचा राजा, माझ्या तु दिलाचा राजा
दिलाची राणी, माझी तु दिलाची राणी



Credits
Writer(s): Budhaditya Mukherjee, Sudhirkumar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link