Dhanya Dhanya Ho Pradakshina

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा-निगमासी
गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा-निगमासी
अनुभवी ते जाणती जे गुरुपदिंचे अभिलाशी

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरूनी काशी

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

मृदुंग-टाळ घोळी भक्त भावार्थे गाती
मृदुंग-टाळ घोळी भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने नित्यानंदे नाचताती

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

कोटी ब्रह्महत्या हरती करता दंडवत
कोटी ब्रह्महत्या हरती करता दंडवत
लोटांगन घालिता मोक्ष लागे हो पायात

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरविला
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरविला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची



Credits
Writer(s): Nandu Honap, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link