Sada Sarvada

सदा-सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आता

कैलास राणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदु:ख हारी
तुजवीण शंभू मज कोण तारी?

मोरया-मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

ज्या-ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या-त्या ठिकाणी निजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकाणी
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
तंया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी



Credits
Writer(s): Sanjeevani Bhelande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link