Bappa

मुखात स्मरण
स्मरणात चरण
रोज रोज येतो देवा
तुलाच शरण
साउली न ऊन
तुलाच पाहून
फेडता ना यावे ऐसें
सारे तुझे ऋण

तुझं नाम घेऊन
सुरू होते जी दिशा
होतो रस्ता तो सोपा

नसते ज्याचे कोणी
असतो त्याचा बाप्पा
ज्याची उदास कहाणी
आनंद त्याचा बाप्पा
नसते ज्याचे कोणी
असतो त्याचा बाप्पा
ज्याची उदास कहाणी
आनंद त्याचा बाप्पा

सुखातही दुखातही
स्मरतो नाव तुझे
रूप तुझे माझ्या मनी
भरतो घाव माझे
सेवा गोड मानून घे
भक्तिभाव जाणून घे
सेवा गोड मानून घे
भक्तिभाव जाणून घे
चुकभूल लेकराची
देवा सांभाळून घे
चुकभूल लेकराची
देवा सांभाळून घे

संपत्ती न धन
नाही रे मागणं
तुझ्या छायेखाली देवा
सुखाच जगणं

तूच तन मन
तुझ्याविना कोण
तुझा पदस्पर्श देवा
भासे मज सोनं

दर्शन घेऊन
दूर होई सारी निराशा
मारतो तुझ्याशी जेव्हा गप्पा

नसते ज्याचे कोणी
असतो त्याचा बाप्पा
ज्याची उदास कहाणी
आनंद त्याचा बाप्पा
नसते ज्याचे कोणी
असतो त्याचा बाप्पा
ज्याची उदास कहाणी
आनंद त्याचा बाप्पा



Credits
Writer(s): Pankaj Harad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link