Yei O Vitthale

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे
(ठेवुनी वाट मी पाहे)

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

आलिया, गेलीया हाती धाडी निरोप
आलिया, गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप
(हो माझा मायबाप)

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
गरुडावरी बैसून...
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला
(हो माझा कैवारी आला)

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे-भावे ओवाळी
(हो जीवे-भावे ओवाळी)

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

असो-नसो भाव आम्हा तुझिया ठाया
असो-नसो भाव आम्हा तुझिया ठाया
कृपादृष्टी पाहे...
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया
(हो माझ्या पंढरीराया)

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
माझे माऊली ये



Credits
Writer(s): Sanjeevani Bhelande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link