Gulawani Gwad

साजणे

पेचात पडलुया तुझ्या गं ठेक्यानं
शिवारं डोलू हे लागलंय
रूपाची नशा तुझ्या चढली बेभानं
रातीला सपानं हे जागतंय

पारा चढलाया, ताप तुझा भरलाया
डोस्क माझ काम करं ना
धडधड छातीत, वाढतीया हुरहूर
डाव आपला ह्यो जुळं ना, का गं जुळं ना?

पोरी तुझं प्रेम कसं गुळावानी ग्वाड लागतंय
हे मन माझ येड्यावानी देवाकडं तुला मागतंय

स्वप्नात रातीला आपल्या वरातीत
गाव बघ सारं नाचु लागला
रंग पिरमाचा चढतुया ईपरित
वावर ईश्काचा पेटला

Hey, उगाचं इथं-तिथं भरकट मन माझ
बनून गं पाखरू हे उडतंय

पोरी तुझं प्रेम कसं गुळावानी ग्वाड लागतंय
हे मन माझ येड्यावानी देवाकडं तुला मागतंय

राया, तुझ्या पिरमात हरवली तुझ्या नादात
मनामंदी माझ्या आज अलगुज वाजं रं
नावावर केलं तुझ्या काळीज हे माझं रं

पोरा तुझं प्रेम मला मधावानी ग्वाड लागतंय
मन माझ येड्यावानी देवाकडं तुला मागतंय



Credits
Writer(s): Kabeer Shakya
Lyrics powered by www.musixmatch.com

Link