Angai Geet Neej Neej Mazya Bala, Tula Jojavite Aai

निज निज माझ्या बाळा
तुला जोजविते आई
स्नेह शब्दात गुंफून
गाते सुरात अंगाई

वारा वाहे अवखळ
तारका ह्या अंबरात
बहरली रातरानी
मोहरला पारिजात

सजलेल्या पाळण्यात
निज निज बाळा आता
रेशमाच्या दोरीने या
झोका देते तुझी माता

ऐक माऊलीचे बोल
हसू नकोस गालात
मीट इवल्या पापण्या
झोप मावेना डोळ्यात

शीण कामाचा घालवी
रूप असे मनोहर
झाडाआडून न्याहाळे
नभातली चंद्रकोर

दृष्ट लागेल कोणाची
लपविते पदरात
तुझ्या पायथ्याशी जागी
तुझी माय सारी रात

निज निज माझ्या बाळा
तुला जोजविते आई
स्नेह शब्दात गुंफून
गाते सुरात अंगाई



Credits
Writer(s): Gayatree Gaikwad-gulhane Sunita Mehetre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link