Jaude

भेटू तू नको
खेटू ही नको
अश्रूकडे मागणे
दाटू तू नको

काहूर आता एकांताचा होउदे

जे गेले त्यांना जाऊदे
मज एकटे आता राहूदे
जे गेले त्यांना जाऊदे
मज एकटे आता राहूदे

तू जाताना वळली नाही
अजूनही मला तू कळली नाही
मी तुटताना तू सावरले नाही
मग अश्रूंना मी आवरले नाही

धावू तू नको
मागे पाहू तू नको
श्वास मोजताना शेवटी
येउ तू नको

वादळ वेदनांचे माझ्या दिशेने वाहुदे

जे गेले त्यांना जाऊदे
मज एकटे आता राहूदे
जे गेले त्यांना जाऊदे
मज एकटे आता राहूदे
अश्रूंनीही शाळा केली
नको त्यासाठी आले दाटूनि
जखम ह्या हृदयाला झाली
भावनांनी घेतले पेटुनी
अन मी

हरलो आता बघ टेकले गुडघे खाली
कधी होता खांदा तुझा आता वेळ कशी आली
हरलो आता बघ टेकले गुडघे खाली
कधी होता खांदा तुझा आता वेळ कशी आली

दिसू तू नको
भासू तू नको
मी सुकवलेली आसवे
पुसू तू नको

काहूर आता एकांताचा होउदे

जे गेले त्यांना जाऊदे
मज एकटे आता राहूदे
जे गेले त्यांना जाऊदे
मज एकटे आता राहूदे



Credits
Writer(s): Pankaj Harad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link