Jaanata Raja

(राजा तु, राजा तु, रयतेचा राजा तु)
(राजा तु, राजा तु, जनतेचा राजा तु)
(राजा तु, राजा तु, रयतेचा राजा तु)
(राजा तु, राजा तु, जनतेचा राजा तु)

मनोमनी, क्षणोंक्षणी तुझे नाव आहे
सर्वकाही तुझ्या ठायी लिनभाव आहे

धगधगती आग तु, वाघांचा वाघ तु
नशीबावर मात तु, पाठीवर हाथ तु
(तु कठोर सत्कर्मी, तुच महाराष्ट्रधर्मी)
(भक्तयोगी, कर्मयोगी, राजयोगी तु)

दहा दिशांतून घुमतो आहे तुझाच गाजा-वाज्या
तुच आमचा रक्षक आणि तु
जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा
(जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा)

हो, तुझ्या नावे माथ्यावरी लावला टिळा हो
तुझ्या चरणाशी आलो, राहू दे लढा
हो, तुझ्या नावे माथ्यावरी लावला टिळा हो
तुझ्या चरणाशी आलो, राहू दे लढा

तडपती तलवार तु, मर्मभेदी वार तु
आमचा कैवार तु, सुखकारक तु
(पेटती मशाल तु, ममतेची शाल तु)
(मायेची ओल तु, प्रेमाचा बोल तु)

दहा दिशांतून घुमतो आहे तुझाच गाजा-वाज्या
तुच आमचा रक्षक आणि तु
जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा
(जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा)

हो, तु कडेकपारी, तुच सागर किनारी
तुच सह्याद्रीच्या उंच शिखरावरी
(हे हृदय मंदिरात तुच, सकल अंतरात तुच)
(तडपशी गगणात सुर्यापरी)

(हो, माऱ्या तु न तुच वारी)
(निर्मळ जळ, तु प्रभारी)
(कडा कोयना, कृष्णा, गोदावरी)

Hey, मायबाप भ्राता तुच, संकटात त्राता तुच
करता-धरता तु आम्हा गरीब
(हो, सळसळते ही धमनी, गर्व सर्व जणी-मनी)
(तुझे गीत क्षणोंक्षण ओठांवरी)

हो, सकलांचा नाथ तुच, हृदयी सम्राट तुच
दुमदुमली ललकारी वाऱ्यावरी

निश्चयाचा महामेरु, बहुतजणांशी आधारु (राजा तु, राजा तु, रयतेचा राजा तु)
अखंड स्मृतिचा निर्धार तु श्रीमंतयोगी (राजा तु, राजा तु, जनतेचा राजा तु)
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, परभ्रवंत (राजा तु, राजा तु, रयतेचा राजा तु)
पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा (राजा तु, राजा तु, जनतेचा राजा तु)



Credits
Writer(s): Sameer Samant, Avadhoot Gupte
Lyrics powered by www.musixmatch.com

Link