Nahi Kunache Koni Ethe

एक बाकी एकाकी
एक अंत एकांत
एक अडके एकात
एक एकटया जगात

नाही कुणाचे कुणी इथे
मी सुद्धा माझा नव्हतो कधी
पडताना ही मी पडलो तिथे
सोबती जिथे नव्हते कुणी

आयुष्य गिरक्या खाते
मन गुंतायला भिते
हृदयाचे वाढती ठोके
Its Okey To Not Be Okey

जगणे का वाटे फिके
नशिबावर साचले धुके
भावनांचे झरे सुके
Its Okey To Not Okey

हल्ली समजून घ्याया वेळ कुणाला
इतकेच समजावले माझ्या मनाला
ज्याला त्याला ज्याचं त्याच दुःख जड आहे
देव जाणे नक्की कुणाचं अवघड आहे

दोन ओळी गातो मोकळा होतो
गुदमरण्याआधी दीर्घ श्वास घेतो
एका हाकेवर येतो मनावर घेतो
माझ्यावेळी एकटा मी माझा तोल जातो

केवढ्या ह्या वेदना
केवढ्या ह्या जखमा
केवढा त्रास हा
खऱ्या खऱ्या भावना
लोकांसाठी खोट्या
उगा अट्टाहास हा

गाताना ही गुणगुणलो तिथे
ऐकण्या गीते नव्हतं कुणी
रडताना ही मी रडलो जिथे
पुसण्या आसवे नव्हतं कुणी

नाही कुणाचे कुणी इथे
मी सुद्धा माझा नव्हतो कधी
पडताना ही मी पडलो तिथे
सोबती जिथे नव्हते कुणी

आयुष्य गिरक्या खाते
मन गुंतायला भिते
हृदयाचे वाढती ठोके
Its Okey To Be Not Okey

जगणे का वाटे फिके
नशिबावर साचले धुके
भावनांचे झरे सुके
Its Okey To Be Not Okey

एक खिडकी एक वारा
एक चंद्र एक तारा
एक नजर एक वाट
एक एकटा एकटाच



Credits
Writer(s): Pankaj Harad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link