Iwalya Iwalya

इवल्या-इवल्या डोळ्यामधी दाटलिया नींद
झो-झो बाळा, झो-झो बाळा झोप रे कुशीत
आज तुझ्या स्वप्नामधी येणार गं परी
फिरायला घेऊन जाणार तुला जादू नगरी

इवल्या डोळ्यामधी दाटलिया नींद
झो-झो बाळा, झो-झो बाळा झोप रे कुशीत

इथं चैन पडं ना अन जीव लागं ना तिथं
खितपत देह पडला नाही थाऱ्यावर चित्त
स्वप्ने पाहिली होती तुझ्या संगे
झोप नाही डोईमध्ये सुरू झाले दंगे

विसरू कसा रे हा भुतकाळ?
विझवू कसा रे हृदयाचा जाळ?
विसरू कसा रे हा भुतकाळ?
विझवू कसा रे हृदयाचा जाळ?

भंगले हर एक स्वप्न, कंपलंय माझ हृदय
डोळ्यांमध्ये उरल्या प्रेमाबद्दलचं भय
ठोक चुकतात जेव्हा येई तुझी अठवण
तरी पण आठवते तुला पुन्हा मन

हसू कसा रे उगाचं खोट?
लपवू कसा रे मनाचा शोक?
विसरू कसा रे हा भुतकाळ?
विझवू कसा रे हृदयाचा जाळ?

नात तुटलं, मैत्री फुटली, दोस्त दुखावला
जिवापेक्षा प्रिय माझा यार गमवला
दुरावले सारे क्षण, राहिलो मी एकटा
चटका लावून गेली आता नाही सुटका

मोकळ करु मी मन कुणापाशी?
मागण मागू मी काय देवापाशी?
विसरू कसा रे हा भुतकाळ?
विझवू कसा रे हृदयाचा जाळ?



Credits
Writer(s): Rohan Rohan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link