Tu Majha Saajana

पाखरू हे उडतंया पिरेमाच्या रानामंदी
तुफान हे सुटलंया मनाच्या या नभामंदी
रूप तुझं भासलं गं नदीच्या या पाण्यामंदी
सूर तुझं गावलं गं कोकिळच्या गाण्यामंदी

टपोर-टपोर, टपोर-टपोर डोळं तुझं, गालावरची खळी
वाट तुझी पाहता मला सपान तुझं पडी
त्या सपनाच्या परीमंदी दिसती मला तुझी छवी

मी तुझा साजणा गं, तु माझी साजणी
मी चांद पुनवाचा, तु माझी चांदणी
मी तुझ्या साजणा गं, तु माझी साजणी
मी चांद पुनवाचा, तु माझी चांदणी

रूप तुझं गोजिरं माझ्या मनामंदी रुजलं
बघुनिया साज तुझा मन चिंब ओल भिजलं
ओ, रूप तुझं गोजिरं माझ्या मनामंदी रुजलं
बघुनिया साज तुझा मन चिंब ओल भिजलं

गंध तुझ्या वेणीचा गं जणू मोगरानी फुललं
बीज तुझ्या पिरमाचं माझ्या अंतरंगी रुजलं
सात जन्माची साथ, हातामंदी घेऊन हात
तुझ्या-माझ्या पिरमाची रं होऊ दे नवी पहाट

ओढ तुझ्या पिरमाची ची रं येगळीच माया
मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया
मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया

मी तुझा साजणा गं, मी तुझी साजणी
मी चांद पुनवाचा, मी तुझी चांदणी
मी तुझा साजणा गं, तु माझी साजणी
मी चांद पुनवाचा, तु माझी चांदणी



Credits
Writer(s): Shubham Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link