Ha Rang Chadhu De

(ही वाट जरी वळणाची बळ येवू दे हिमतीला)
झुंझार होऊनी ललकार आसमानाला

(लावूनी कपाळी माती घे झेप क्षितिजापाठी)
हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती
मानमनी, अभिमान मनाची शान खुल्या असमानी
(शान खुल्या असमानी)

हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे
हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे
(हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे)
(हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे)

रोज मनी काहूर, रोज नवी हूर-हूर
देऊनी जरासा धीर, दे स्वप्नाला आकार
(दावूनी मनाची धाटी घे धाव उजेडापाठी)
रोज मनी काहूर, रोज नवी हूर-हूर
देऊनी जरासा धीर, दे स्वप्नाला आकार

ठिणगीतून इवल्या अंगार जरा बरसू दे
उसळूनं जोर धमण्यांचा दे टक्कर आव्हानाला

हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे
हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे
(हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे)
(हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे)

काट्याची वाट अघोरी, अंधार पावलाखाली
काहूर दाटले मोठे नियतीच्या सावटा खाली
(दावूनी मनाची धाटी घे धाव उजेडापाठी)
काट्याची वाट अघोरी, अंधार पावलाखाली
काहूर दाटले मोठे नियतीच्या सावटा खाली

श्वास रोखुनी थांब जरा, ध्यास मनाला सांग जरा
अलवार काळजात तेवू दे आशेचा दिवा

हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे
हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे
(हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे)
(हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे)

(घे ममता मायेची रे सोबतीला)
(मातीचा गंध जरासा घे सोबतीला)
घामाच्या थेंबामधूनी अंकुर उगवूनी यावा
अंगार नव्या धमण्यांचा रुजवात बनुनी जावा
शिव धनुष्य घे पेलूनी, सामर्थ्या लाव पणाला

हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे
हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे
(हा रंग चढु दे, ही झिंग चढु दे)
(हो सुर्य नवा आभाळी तेज नवे झळकू दे)



Credits
Writer(s): Sanjay Navgire, Ashok Kamble, Baban Adagale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link