Jansagar Lotala

सहा डिसेंबर चैत्यभूमीवर...
सहा डिसेंबर चैत्यभूमीवर कंठ हा माझा दाटला
सहा डिसेंबर चैत्यभूमीवर कंठ हा माझा दाटला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला

खेडो-पाडी देशातून रांग लागली, रांग
प्रत्येक माणूस हेच बोलतो, "फेडू कसे हे पांग"
खेडो-पाडी देशातून रांग लागली, रांग
प्रत्येक माणूस हेच बोलतो, "फेडू कसे हे पांग"

हृदयामधल्या ह्या हुंदक्यांचा...
हृदयामधल्या ह्या हुंदक्यांचा वनवा जणू हा पेटला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला

जीवनी आला दुःखाचा काळ, असा हा काळ
स्मरणी राहील सहा डिसेंबर ५६ चे हे साल
जीवनी आला दुःखाचा काळ, असा हा काळ
स्मरणी राहील सहा डिसेंबर ५६ चे हे साल

चिल्या-पिल्यांना घेऊन संगती...
चिल्या-पिल्यांना घेऊन संगती पल्ला दूरचा गाठला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला

सागर तीरी अश्रूंचा वाहू लागला पूर
एकमेकाला मुकुंदासवे देऊ लागले धीर
सागर तीरी अश्रूंचा वाहू लागला पूर
एकमेकाला मुकुंदासवे देऊ लागले धीर

शांत झोपला आमचा पिता हा...
शांत झोपला आमचा पिता हा रम्य अशा या पाटणा
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला

बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला
बाबा, तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला



Credits
Writer(s): Anand Shinde, Mukund Sonavne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link