Swarbramhala Aarjav Mi Karito (feat. Atharva Dhage & Samruddha Wavikar)

स्वरब्रह्माला आर्जव मी करितो

अशी उन्मनी प्राप्त व्हावी अवस्था
कळों संगीतातील संजीवनी
पुढे गायनातून चैतन्य वाहो
मिटू दे उभा जन्म या लोचनी
तव चरणाशी ओंजळ मी धरितो

अनाहत लयीचे जगत ईश्वरा तू
समेवर पडो आमुची याचना
नव्हे फक्त नांदी वृथा आळवाया
असे हृदयतालात ही प्रार्थना
श्रवण कराया अवतरला हरी तो

स्वरब्रह्माला आर्जव मी करितो



Credits
Writer(s): Atharva Dhage
Lyrics powered by www.musixmatch.com

Link