Tujhi Bhet

जसे ओल्या पाठीवर कोवळे ऊन
आकाशवाणीवर आवडती धुन
खिशातले अवचित नाणे
हासरे एक बाळ तान्हे

अशी रोज रोज
भेटावी रोज रोज रोज
केवळ हे जाणे
मन केवळ हे जाणे

आपुल्या भेटीत जसा मी असतो
तसा या विश्वात कुठेच नसतो
ओझे कुठले भासत नसते
गुरुत्व तुझे कारण असते

ह्या वलयात मी हरवतो
लक्ष शब्द व्यक्तं, तुजपाशी होतो
मनी नीरवता अद्भुत असते
शून्याचा अर्थ मला उमगतो

अशी रोज रोज
भेटावी रोज रोज रोज
केवळ हे जाणे
मन केवळ हे जाणे



Credits
Writer(s): Shaunak Chandorkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link