Prabhu cha kar

प्रभुचा कर धन्यवाद
हे माझ्या जीवा प्रभु चा कर धन्यवाद

त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद
स्मरूनी उपकार कर तू धन्यवाद

सर्व दुष्कर्मांची क्षमा तो करितो
सर्व रोगही तुझे बरे तो करितो

उत्तम पदार्थांनी तृप्त तो करितो
तारूण्य गरुडापरी नवे तो करितो

ममता करि जसा बाप मुलांवरी
तशी दया करी जे त्याचे भय धरी

मातीचा मानव आयुष्य गवतासमान
वारा जाता क्षणी न राही ठाव ठिकाण

प्रभूचे वचन नित्य जे पाळीतात
दया सनातन ते अनुभवितात

सर्व सृष्टीवर जो राजांचा राजा
दंडवत करुनी त्यास स्तवू या



Credits
Writer(s): Albert Sunil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link