Man Udhan Varyache (feat. Ashwini Patil)

मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते

मन उधाण वाऱ्याचे गूंज पावसाचे
का होते बेभान असे गहिवरते
मन उधाण वाऱ्याचे गूंज पावसाचे
का होते बेभान असे गहिवरते
मन उधाण वाऱ्याचे

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते घडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

मन उधाण वाऱ्याचे गूंज पावसाचे
का होते बेभान असे गहिवरते
मन उधाण वाऱ्याचे गूंज पावसाचे
का होते बेभान असे गहिवरते
मन उधाण वाऱ्याचे

एकांत मला छळतो छळतो तुझा दुरावा
सावरू कशी मी या वेड्या जीवाला
हे हृदय एक आपुले एक स्पंदनाची साथ
भेटुनी पुन्हा करू मनातली ती बात

सात जन्माची कहाणी
मी तुझीच राणी
घेऊनी मिठीत मग
विसरू दुनिया सारी

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वाऱ्याचे



Credits
Writer(s): Trushank Mhatre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link