Tu Majhi Radha

बघतो मी तुला जवा, होतो येडा-पिसा तवा
बघतो मी तुला जवा, होतो येडा तवा
न्यारं भरलं वारं खुळ लागतं जीवा
न्यारं भरलं वारं खुळ लागतं जीवा

मी छेडतो हा साज तुझ्यासाठीच आज
मी छेडतो हा साज तुझ्यासाठीच आज
मी झालो तुझ्यावर फिदा

मी किसन तुझा, तु माझी राधा
तुझ्या पिरतीत झालोया गं आधा
मी किसन तुझा, तु माझी राधा
तुझ्या पिरतीत झालोया गं आधा

हो, मला भान ना जगाचं, तुझ्या पिरमात पडलो
दिस-रात सरं ना तुझ्या ध्यानात बुडलो
हो, मला भान ना जगाचं, तुझ्या पिरमात पडलो
दिस-रात सरं ना तुझ्या ध्यानात बुडलो

साऱ्या जगात तु मनात माझ्या भरली
जादू कशी माझ्यावरती मंतरली?
साऱ्या जगात तु मनात माझ्या भरली
जादू कशी माझ्यावरती मंतरली?

नजरेची जादू करतेस का तु?
अशी नजरेची जादू करतेस का तु?
मी बघता तुला झालो बावरा

मी किसन तुझा, तु माझी राधा
तुझ्या पिरतीत झालोया गं आधा
मी किसन तुझा, तु माझी राधा
तुझ्या पिरतीत झालोया गं आधा

कानी येई जवा तुझी बासरी
मी वेडी झाली राधा तुझी बावरी
हो, कानी येई जवा तुझी बासरी
मी वेडी झाली राधा तुझी बावरी

काय कसं सांगू माझ्या मनातली गूज
डोळ्यातून वाच, मला वाटते रे लाज
काय कसं सांगू माझ्या मनातली गूज
डोळ्यातून वाच, मला वाटते रे लाज

रंगले तुझ्यात, किती रंगले तुझ्यात
रंगले तुझ्यात, किती रंगले तुझ्यात
अशी लागली मी तुझ्याच नादात
मला चढली ही सावळी बाधा

तुझ्या पिरतीत वेडी झाली राधा
तु किसन माझा, मी तुझी रे राधा
तुझ्या पिरतीत वेडी झाली राधा
मी किसन तुझा, तु माझी राधा

तुझ्या पिरतीची झाली मला बाधा
तु किसन माझा, मी तुझी रे राधा
तुझ्या पिरतीत झालोया गं आधा



Credits
Writer(s): Manish Ansurkar, Rohit Nanaware
Lyrics powered by www.musixmatch.com

Link