Gwadi Tujhi

उगवला चांद पुनवचा आज हा
हारलाय ठाव गं मनाचा सांग का?
उगवला चांद पुनवचा आज हा
हारलाय ठाव गं मनाचा सांग का?

वळखीचं जग सारं वाटतंय
सपान बी खरंखुरं वाटतंय

ग्वाडी तुझी मला गं लागली, लागली
मनाला ओढ तुझी लागली
ग्वाडी तुझी मला गं लागली, लागली
मनाला ओढ तुझी लागली

पैंजनाची छूनछून सांगतिया गं
आस तुझी या जिवाला लागलिया गं
श्वासामंदी नाव तुझं माळलंया गं
उधळून जीव तुझ्या नाव केला गं

साता जन्माचं नातं बांधलंय
सपान बी खरंखुरं वाटतंय

ग्वाडी तुझी मला गं लागली, लागली
मनाला ओढ तुझी लागली
ग्वाडी तुझी मला गं लागली, लागली
मनाला ओढ तुझी लागली

पाचोळा मी तुझ्यासंग वाहतोया गं
नजर ही तुझ्यावर थांबतिया गं
हातामंदी हात येता जागलंया गं
मनामंदी घर तुच बांधलंया गं

रित-भात सोडूनिया साधतंय
सपान बी खरंखूरं वाटतंय

ग्वाडी तुझी मला गं लागली, लागली
मनाला ओढ तुझी लागली
ग्वाडी तुझी मला गं लागली, लागली
मनाला ओढ तुझी लागली



Credits
Writer(s): Rahul Kale, Lk Laxmikant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link