Kalajat Mukkam Kela

नकळत माझ्या लई दिसानी
असा जिव्हारी रुतला कुणी
भलत्या येळी मोहर फुटला
अन शिरशिरी पानोपानी

जरी होता साधा-भोळा
त्यानं हळूच भिडवून डोळा
जरी होता साधा-भोळा
त्यानं हळूच भिडवून डोळा

जरी होता साधा-भोळा
त्यानं हळूच भिडवून डोळा

सारा नजरनं कारभार केला
कसा कधी बाई त्यानं मला कळलंच न्हाई
काळजात मुक्काम केला
गं बाई, माझ्या काळजात मुक्काम केला

(कुणी सरदार मोठा की तालेवार होता)
(ह्या खेळामंदी तो मुरलेला)
(की नुसताच पाहुणा गर्दीतला)
(तुझ्या रूपानं झपाटलेला)

माझ्या काळजात मुक्काम केला
गं बाई, माझ्या काळजात मुक्काम केला

झाली जीवाची घालमेल सुरू
उमगं ना काय करू?
तोल जाई नजरंचा
लागली अवघा भिरभिरू

झाली जीवाची घालमेल सुरू
उमगं ना काय करू?
तोल जाई नजरंचा
लागली अवघा भिरभिरू

कुठं गेला कधी कुण्या गावा?
गं बाई, त्याचा लागं ना काही सुगावा
अगं बाई, बाई, बाई

(कुणी कारभारी मोठा की सरकारी होता)
(शिकारी ह्यो दबलेला)
(की नुसताच पाहुणा गर्दीतला)
(तुझ्या रूपानं झपाटलेला)

माझ्या काळजात मुक्काम केला
गं बाई, माझ्या काळजात मुक्काम केला

त्याच्या नजरेचा त्यो वार
असा गेला जणू आरपार
त्याच्या बघून ५६ तऱ्हा
अंगा-अंगात शिरलं वारं

त्याच्या नजरेचा त्यो वार
असा गेला जणू आरपार
त्याच्या बघून ५६ तऱ्हा
अंगा-अंगात शिरलं वारं

जीव अलगद कापूस झाला
पिसं मनाला भलतच लावून गेला
अगं बाई, बाई, बाई

(कुणी फेटेवाला होता की टोपीवाला होता)
(तो इश्कात रसरसलेला)
(की नुसताच पाहुणा गर्दीतला)
(तुझ्या रूपानं झपाटलेला)

माझ्या काळजात मुक्काम केला
गं बाई, माझ्या काळजात मुक्काम केला



Credits
Writer(s): Guru Thakur, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link