Tujha Sajana (feat. Ankita Raut & Ajju Jadhav)

पडू लागलं, धडपडू लागलं
जीव कसंतरी हे सावरू लागलं
पडू लागलं, धडपडू लागलं
जीव कसंतरी हे सावरू लागलं

सांगू कशा या भावना?
पिरतीच्या दारी वाट पाहू लागलं

बावऱ्या राधेला भेटला किसना
तू माझी साजणी, मी तुझा साजणा
बावऱ्या राधेला भेटला किसना
तू माझी साजणी, मी तुझा साजणा

इश्क माझं खुळं, राणी, तुझ्यावर जिंदगानी
उधळून टाकाविशी वाटते मला
येगळीच अशी भेट, देवानच दिली थेट
जपून या काळजात ठेवीन तुला
वचन हा लाख मोलाचा, सखे तुला

ताल नवा, सूर नवा
तरी का हवा-हवा वाटू लागलं?

बावऱ्या राधेला भेटला किसना
तू माझी साजणी, मी तुझा साजणा
बावऱ्या राधेला भेटला किसना
तू माझी साजणी, मी तुझा साजणा

हसू आलं गालावर, झाला मला, झाला प्यार
तुझ्याशी सांग पोरा, लपवू कशी?
हात घेऊन हातामंदी, फिरू साऱ्या गावामंदी
सात जन्माची गाठ बांधली अशी
फुललेल्या रानमाळी पाखरं जशी

झाल्या धुंद वाऱ्यासंग
पंख नसताही मन उडू लागलं

बावऱ्या राधेला भेटला किसना
मी तुझी साजणी, तू माझा साजणा
बावऱ्या राधेला भेटला किसना
मी तुझी साजणी, तू माझा साजणा



Credits
Writer(s): Sagar Gaikwad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link