Odh Lagali Jivala

ओढ लागली जीवाला, जीवाला गं
ओढ लागली जीवाला, जीवाला गं
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?

किती आवरू मनाला, मनाला गं
किती आवरू मनाला, मनाला गं
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?

(हिचा साजन दूर देशी, भेट होईल हिची कशी?)
(हो, हिचा साजन दूर देशी, भेट होईल हिची कशी?)

मी माझी मला पाहते आणि पाहून हासते
तो आल्याची चाहूल मला सारखी भासते
मी माझी मला पाहते आणि पाहून हासते
तो आल्याची चाहूल मला सारखी भासते

येते आठवण क्षणा-क्षणाला, क्षणाला गं
येते आठवण क्षणा-क्षणाला, क्षणाला गं
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?

(हिचा साजन दूर देशी, भेट होईल हिची कशी?)
(हो, हिचा साजन दूर देशी, भेट होईल हिची कशी?)

भेट होईल सख्याची, कधी येईन तो दिस?
त्याच्या भेटीसाठी माझा जीव झाला कासावीस
भेट होईल सख्याची, कधी येईन तो दिस?
त्याच्या भेटीसाठी माझा जीव झाला कासावीस

कसं सांगू मी कुणाला, कुणाला गं?
कसं सांगू मी कुणाला, कुणाला गं?
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?
कधी भेटेन मी माझ्या साजनाला गं?

(हिचा साजन दूर देशी, भेट होईल हिची कशी?)
(हो, हिचा साजन दूर देशी, भेट होईल हिची कशी?)



Credits
Writer(s): Lilesh Ruke, Vilas Joglekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link