Bhim Pahila

भीम पाहिला गं बाई, भीम पाहिला गं
भीम पाहिला अन् त्याला जन्म वाहिला
(भीम पाहिला गं बाई, भीम पाहिला गं)
(भीम पाहिला अन् त्याला जन्म वाहिला)

जाती विषमता जरी पोळली आम्हाला
जाती विषमता जरी पोळली आम्हाला
निखाऱ्याच्या वाटेवरी चाले भीम एकला
निखाऱ्याच्या वाटेवरी चाले भीम एकला

दुःख झेलणारा, काळ छेदणारा
पाहिला धुरंदर मी जाऊनी विहारा
(भीम पाहिला गं बाई, भीम पाहिला गं)
(भीम पाहिला अन् त्याला जन्म वाहिला)

देशासाठी बा भीमा किती झुरला गं
देशासाठी बा भीमा किती झुरला गं
न्याय, हक्कासाठी पुरून उरला गं
न्याय, हक्कासाठी पुरून उरला गं

दलितांच्या मनामधी बुद्ध कोरला वं
महुगावी माझा भीम गावला गं
(भीम पाहिला गं बाई, भीम पाहिला गं)
(भीम पाहिला अन् त्याला जन्म वाहिला)

मी पाहिले तैसे या जनासाधा
दिसू दे भीमा त्यांना एक-एक श्वास घेता
दिसू दे भीमा त्यांना एक-एक श्वास घेता
जग चातकाचे जैसे थेंब परी बदलता
स्वर्गसुख लाभते भीम माझा दिसता

भीम पाहिला गं बाई, भीम पाहिला गं
भीम पाहिला अन् त्याला जन्म वाहिला
भीम पाहिला गं बाई, भीम पाहिला गं
भीम पाहिला अन् त्याला जन्म वाहिला

(भीम पाहिला, जन्म वाहिला)
(जन्म वाहिला, भीम पाहिला)
(भीम पाहिला, जन्म वाहिला)
(जन्म वाहिला, भीम पाहिला)



Credits
Writer(s): Amit Salve, Avinash Mane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link