Anand Harpla

मुखात सुखाची साखर ठेवुन
जोडली जन्माची नाती
रामाच्या रूपात जपला माणूस
मारुती रायाची छाती

वाघाची लीला नि कपाळी टिळा
तु उजेड अंधारासाठी
भनक भीतीची नव्हती भवती
आभाळ रे माझ्यापाठी

देऊन किनारा मनाच्या
होळीचा सारंग हरवला

माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला

नाराज नशीब घेऊन
एखादा जन्माला आलेला कुणी
पडली नजर तुझी त्याच्यावर
आखंड राहिला ऋणी

विसर पडावा घडून ये
कधी जिव्हारी जिवंत जाणं
दारात तुळस, कौलारू कळस
देव्हाऱ्यात तुझा मान

दीनांचा देव्हारा सोडून
मोकळा श्रीरंग परतला

माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला

देऊन कान तु ऐकली गाऱ्हाणी
सदैव देवाच्या आधी
सवाल छळतो आता मी कुणाला
दाखवू नवचं यादी

वार-सणवार, रेखीव रांगोळी
दारात सजेल जेव्हा
वादळ होऊन तुझी आठवण
दाटून येईल तेव्हा

घरा घरातला उंच
थरातला गोविंद हरवला

माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला

वाऱ्याला खुपली आनंद झुळूक
विझला तेजाचा दिवा
असाच उजेड देणारा दिवा
तो आणील कुठून नवा?

येतील-जातील देणारे हाथ
तु तिथे ही उजवा देवा
गाय-गरीबाची बात नको
तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा

देऊन भरारी आभाळा
पल्याळ पतंग सरकला

माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला, हरपला



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Mahesh, Chinar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link