Chandra

थांबला का उंबऱ्याशी? या बसा राजी-खुशी
घ्या सबुरीनं विडा का उगा घाई अशी?
विझला कशानं सख्या-सजणा
सांगा लुकलुकणारा दिवा?
वणवा जिव्हारी धुमंसल
रायाजी, रातभर आता नवा

नार नटखट-नटखट अवखळ
तोऱ्याची तरनी-ताठी नखऱ्याची
अशी लचकत, मुरडत, झुलवत
आले मी नाजुक छमछम घुंगराची
बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा

चंद्रा, रात रंगी रती रंगूनी
चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी
चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी
चंद्रा...
हो, सरती, ही बहरती, रात झुरती चांदण्याची
जीव जाळी, येत नाही चाँद हाताला
लहरी याद गहीरी, साद जहरी काळजाची
घ्या दमानं ह्या उधाणाच्या इशाऱ्याला

अवघड थोडं राया, नजरंचं कोडं राया
सोडवा धिरानं, साजणा

नार नटखट-नटखट अवखळ
तोऱ्याची तरनी-ताठी नखऱ्याची
अशी लचकत, मुरडत, झुलवत
आले मी नाजुक छमछम घुंगराची
बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा

चंद्रा, रात रंगी रती रंगूनी
चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी
चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी
चंद्रा...



Credits
Writer(s): Ajay-atul, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link