Mi Navi Kahani

मी नवी कहाणी, मी नवी कहाणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी
मी नवी कहाणी होऊन वाणी
मी नवी कहाणी होऊन वाणी
गाते भिमाची गाणी

मी नवी कहाणी...
मी नवी कहाणी होऊन वाणी
गाते भिमाची गाणी
मी नवी कहाणी...

मी नव्या युगाची गाणारी
त्या भीमपथाने जाणारी
(मी नव्या युगाची गाणारी)
(त्या भीमपथाने जाणारी)

जाऊन जगाला मोलाची
जाणीव इथे मी देणारी
मी गाणारी तशीच माझी
नव्या युगाची ललकारी

मी गाणारी तशीच माझी
नव्या युगाची ललकारी

मी गाणी गायील...
मी गाणी गायील, चोखित जाईल
नव्या पिढीचे पाणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी

चाहूल असे मी काळाची
मी माय उद्याच्या बाळाची
(चाहूल असे मी काळाची)
(मी माय उद्याच्या बाळाची)

ते बालक माझे बालपणी
तोडील फुले आभाळाची
चंद्रावरती करील स्वारी
पोर इथे गोपाळाची

चंद्रावरती करील स्वारी
पोर इथे गोपाळाची

मी वाट पाहते आज...
मी वाट पाहते आज उद्याची अशी मोरनिवानी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी

जे बोल भिमाचे आठवले
सारेच अंतरी साठवले
(जे बोल भिमाचे आठवले)
(सारेच अंतरी साठवले)

नव्हते आपले ते-ते सारे
आपले करुनी पाठवले
त्या कोटी-कोटी बाळांना
हे बाळकडू मी चाटवले

त्या कोटी-कोटी बाळांना
हे बाळकडू मी चाटवले

मी अंकित केले...
मी अंकित केले जागलेले कोटी-कोटी प्राणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी

मी काय म्हणावे ताडांना
गगना भिडणाऱ्या माडांना
(मी काय म्हणावे ताडांना)
(गगना भिडणाऱ्या माडांना)

नादान बिचारे मूढपणे
हसती ह्या खुरट्या झाडांना
काय कल्पना असे उद्याची
आज अशा मुरदाडाला

काय कल्पना असे उद्याची
आज अशा मुरदाडाला

जा सांग जा वामन...
जा सांग जा वामन यांचे सर्पण करील या मैदानी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी

मी नवी कहाणी होऊन वाणी
गाते भिमाची गाणी
मी नवी कहाणी, मी नवी कहाणी
मी नवी कहाणी...



Credits
Writer(s): Dr Sanjay Mohad, Waman Tabaji Kardak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link