Raat Takali-Freeverse

रात टाकली कात टाकली फेम साठी बाकीच्यांनी लाज टाकली राख टाकली साप वाढली सिन मध्ये भुरट्यानी वाट लावली साथ घातकी पाठ दाखवली कामासाठी फक्त ह्यांनी लाळ चाटली करत होते सुमडित उंगली मला मी नकळत जाऊन ह्यांची बोटं छाटली
वाजुदेत ज्याला वाजतोय बोगस
नव्या नवरीचे ९ हे दिवस
बसुदेत ह्यांना डीस डीस करत
मी करतोय पेड work काम आहे बरच
तुझा बाप गाणे शेयर नाही करत
whatsapp वर स्टेटस तो कधी ना ठेवत
गाणे माझे सारे सहकुटुंब बघत
तुझ्यात नी माझ्यात हाच आहे फरक

हे ट्रेण्ड करतात फॉलो करू का मी
तू wannabe रॅपर मी नवशाहीर
ह्यांच्या गाण्यामुळे बिघडली पिढी सारी
लहान पोरगं पण आता आई बहीण काढी
म्हणून आणतो मी जागेवर पडले जे भान
अर्थ या कलेचा का नाही त्याची जाण
करतो मी सादर ज्याचा राखून मी मान
ऐकावे तुम्ही आता खोलून हे कान
भाषा मराठी,माझी बोली मराठी,माझी माय मराठी,माझी वाणी मराठी,अभिमान मराठी,स्वाभिमान मराठी,हा रॅप मराठी,हा swag मराठी,ही जात मराठी,हा थाट मराठी,जिद्द मराठी हा श्वास मराठी,काहीतरी वेगळं हे बोलतात मला माझं नाव रॅपर A-JIT मराठी



Credits
Writer(s): Abhijit Chorat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link