UMALU DYA

उमलू द्या, उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या
(उमलू द्या, हो उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या)
जगदंबेची ही मूर्ती जगी जन्माला येऊ द्या
(उमलू द्या, हो उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या)

कोमल सुंदर ती मूर्ती, तेजाची जणू अनुभूती
पाहिलं प्रेमे जेव्हा ती येईल आनंदा भरती
हास्य मुलीचे ते घुमता, घर नंदनवन होऊ द्या
(उमलू द्या, हो उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या)

होईल ताई छोटूची, प्रेमळ पत्नी नवऱ्याची
गाईल बाळासाठी ही गीते ही अंगाईची
देवालाही ओढ तिची, अशी माऊली जन्मू द्या
(उमलू द्या, हो उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या)

नसे उणी ती ज्ञानाने, धैर्याने वा कष्टाने
पुत्रासम समजा तिजसी करील संधीचे सोने
सासर-माहेर दोन्ही कुळे, कन्येला या उजळू द्या
(उमलू द्या, हो उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या)

स्त्री-पुरुषांची समसंख्या करेल सुदृढ देशाला
समर्थ असते ही नारी, म्हणू नका तिजसी अबला
वैभवी देशाला नेण्या प्रगती स्त्रीला साधू द्या
(उमलू द्या, हो उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या)
(उमलू द्या, हो उमलू द्या, सुंदर कळी ही उमलू द्या)

Credits
Writer(s): Mohan Bedarkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link